जळगाव मिरर । ८ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुली ने बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला असताना ही घटना ताजी असताना पुन्हा जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा चाळीसगाव ग्रामीण व एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत पाचोरा तालुक्यातील एका गावातून मध्यरात्रीच्या सुमारास १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस काहीतरी फूस लावून व आमिष देऊन पळून नेले आहे. याप्रकरणी एका तरुणावर संशय असल्याचे देखील समजते या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे हे करीत आहे.
दुसऱ्या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून दिनांक ३ रोजी च्या रात्री १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने काहीतरी फुस लावून पळून नेल्याप्रकरणी मुलीच्या पालकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील हे करीत आहे.
तर तिसऱ्या घटनेत एरंडोल तालुक्यातील एका गावातून दिनांक ३ रोजीच्या भर दिवसा १७ वर्षीय मुलीस काहीतरी फुल लावून एकाने पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या पालकांनी एरंडोल पोलीस स्थानकात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पीएसआय शरद बागल हे करीत आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुली तसेच तरुणांनींना पळून नेल्याच्या घटना नियमित घडत आहे.