
पुणे : वृत्तसंस्था
रात्री दोन वाजेच्या सुमारास एक कार मुठा नदीच्या वाढलेल्या प्रवाहात सापडली आणि ती वाहू लागली. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याजवळ मुठा नदीपात्रात थरारक घटना घडली. या घटनेनंतर सुरू झाली त्यांना वाचवण्याची बचाव मोहीम. या बचाव मोहीमेचे व्हिडिओ समोर आले आहेत. कारमधील असलेले कुटुंब हे पालघरचे आहेत. आपल्या लहान भावासाठी बहिणीची टाहो फोडला होता. माझा भाऊ कुठे आहे… असं ती सतत म्हणत होती. सुदैवाने सर्वजणांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं.
मुठा नदीत एस. एम जोशी पुलाखाली नदी पात्राच्या रस्त्यावर एक कार पाण्यात वाहून जात असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. यानंतर एरडवणा केंद्राचे मदत मुठानदीजवळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रात्रीच्या अंधारात आणि मुठा नदीच्या वाढलेल्या पाणीपात्रात बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान रोप, लाइफ जॅकेटच्या साह्याने नदी पात्रात उतरून वाहत असलेल्या टाटा टिगोरो या कारजवळ पोहोचले. यावेळी कारमधील सर्वजण अतिशय घाबरलेले होते. जीवमुठीत धरून सर्वजण बसले होते. भेदरलेल्या अवस्थेत सर्वजण होते.




















