जळगाव : प्रतिनिधी
शिवसेनेने मला मोठे केले असे म्हणणारे गुलाबराव पाटील हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले. त्यावेळची स्थिती आणि मनस्थिती त्यांनी गणरायाचे आगमन झाल्यानंतर व्यक्त केली.
”मी शिंदे गटात गुवाहाटीला सहभागी होताना जो निर्णय घेतला, त्यावेळी क्षणोक्षणी गणपती बाप्पाच नव्हे, तर अक्षरशः सर्व देव आठवत होते, अशी कबुलीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
आज ते आणि जुने सहकारी एकत्र आले. त्यावरही त्यांनी आम्ही काय एकमेकांना गोळ्या घातल्या नाही असे सूचक वक्तव्यही केले.
अखंड परंपरेनुसार मंत्री गुलाबराव पाटील यांच्याघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. मोठ्या भक्ती भावाने मंत्री पाटील यांच्या घरी दहा दिवस बाप्पांची स्थापना केली जाते. यंदाही त्यांच्या घरी भक्तीपूर्ण वातावरणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सपत्नीक गणरायाची स्थापना केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
गुलाबराव पाटील म्हणाले, राजकारणात भांडणावेळी भांडण करायचे, पण त्यासाठी वैयक्तिक संबंध खराब करण्यात अर्थ नाही. जूने सहकारी आज एकत्र आले, राजकारणात हे चालतेच, प्रारब्धाशिवाय काहीच नसते. नशिबाला माणसाने ठोकायचे असते.
गुलाबराव पाटील म्हणाले, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज वेगळे आहेत पण ते एकमेकांच्या दुःखात जात नाहीत असे नाही. आ्म्ही आज एकत्र आलो यात नवल नाही. आम्ही एकमेकांना गोळ्या घातलेल्या नाहीत.