जळगाव मिरर | २३ एप्रिल २०२४
मतदान करायला फक्त पाच मिनिटे वेळ लागतो परंतु हे पाच मिनिटे तुमचे पुढील पाच वर्षांचे भविष्य ठरवतात म्हणुन मतदान करताना तरुणांनी गेल्या पाच वर्षातील बेरोजगारी महिलांनी महागाई, त्यांच्यावर झालेले अत्याचार, त्यांचा विषयी काढलेले अनुदगार त्यातून महिलांचा झालेला अपमान, शेतकरी बांधवानी पडलेले शेतमालाचे भाव ,वाढलेल्या खतांच्या किमती आठवुन योग्य निर्णय घेवून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केले.
रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष म्हणुन कार्य करत आहेत त्या अनुषंगाने त्या राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दौरे करत आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंगणघाट येथे प्रचार सभा पार पडली.
या सभेत उपस्थित पदाधिकारी, मतदारांना मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्या आपल्या सर्वांचा जो उत्साह दिसतोय त्या उत्साहात येत्या 26 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करून अमर काळे यांना मतदान रुपी आशिर्वाद द्यावे हि विनंती करायला आम्ही सर्व जण आले आहोत. तुमचा सर्वांचा उत्साह बघुन मला खात्री आहे तुमचे आशिर्वाद अमर काळे यांच्या पाठीशी आहेत आणि अमर काळे नक्की निवडून येतील हा तुमच्या प्रतिसादावरून मला विश्वास आहे.
महाराष्ट्रा मध्ये महाविकास आघाडी साठी पुरक असे वातावरण आहे. एक उस्फुर्त असा प्रतिसाद महाविकास आघाडीला तरुण, महिला, शेतकरी देत आहेत. पण फक्त उत्साह दाखवून सभेला हजेरी लावून होणार नाही आपल्याला बदल घडवायचा आहे आणि त्यासाठी माझी सर्व पदाधिकारी ,कार्यकर्त्यांना विनंती आहे येत्या २६ तारखेला गाव, वाडा, वस्ती, बुथची जबाबदारी घ्या. मतदान केंद्रापर्यंत मतदान कसे पोहचेल यासाठी प्रयत्न करा. माझ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपण घरातील चुलीपर्यंत जाऊ शकतो आपण जास्तीत मतदान काढण्यावर भर द्यायला हवा. आपण माता भगिनी घराबाहेर पडून मतदानासाठी गेलो तर आपण आपली परिस्थिती बदलवू शकतो गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात जर कुणाला सर्वात जास्त झळ बसली असेल तर ती आपल्या माता भगिनींना आहे. मतदान करायला फक्त पाच मिनिटे वेळ लागणार आहे पण या पाच मिनिटाच्या काळामध्ये तुमच्या पुढील पाच वर्षाचे भवितव्य ठरणार आहे .
पाच मिनिटाच्या मतदानाच्या काळामध्ये तुमच्या मतदानातून येत्या पाच वर्षांमध्ये उमेदवाराकडून, खासदाराकडून तुम्हाला काय हवंय काय अपेक्षित आहे आणि ते तुम्हाला कोणता उमेदवार देऊ शकतो हे पाच मिनिटाच्या मतदानावर अवलंबून राहणार आहे. म्हणून पाच मिनिटांचे मतदान करताना तरुणांनी तुमची बेरोजगारी लक्षात ठेवा. महिलांनी तुमच्यावर झालेले अत्याचार ,तुमच्या विषयी भाजप नेत्यांनी काढलेले अनुदगार त्यातून तुमचा झालेला अपमान आणि वाढलेली महागाई मुळे घर संसार चालवायला करावी लागणारी कसरत लक्षात ठेवा. शेतकरी बांधवांनी गेल्या पाच वर्षात शेतमालाला भाव मिळाला नाही,खतांच्या बेसुमार किंमती वाढल्या हे सर्व लक्षात ठेवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. तुम्ही सर्व सुज्ञ आहात आणि तुम्ही सूज्ञतेने मतदान कराल हा मला विश्वास आहे. परत एकदा अमर काळे यांच्या तुतारी वाजवणारा माणुस या निशाणी समोरील बटण दाबून अमर दादा काळे यांना विजयी करा असे सर्वांना आवाहन करते आणि तुम्ही सर्व मतदार नक्कीच अमर काळे यांना विजयी करतील असा विश्वास आणि आशा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आपचे दिल्ली येथिल खासदार संजय सिंह, उमेदवार अमर काळे, आमदार रणजित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,मतदार मोठ्या उपस्थित होते