
सोलापूर : वृत्तसंस्था
येथील श्री समर्थाच्या बैठकीतील जेष्ठ निरुपणकार रंगाभाऊ कुलकर्णी यांचे दि २ जुलै शनिवार रोजी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास निधन झाले. दि ३० जून रोजी त्यांचा एका वाहनाच्या धडकेत अपघातात डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर २ रोजी पहाटे त्यांनी प्राणज्योत मालवल्याने श्री सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सद्गुरू नानासाहेब धर्माधिकारी यांच्या माध्यमातुन चालविली जाणारी आध्यत्मिक चळवळ सोलापूर जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणावर नेण्यात त्यांचा खारीचा वाट होता. प्रतिष्ठानच्या माध्यमांतून अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या या निधनाने श्री सदस्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत, धार्मिक आणि मनमिळावू असा त्यांचा धार्मिक स्वभाव होता. जुने सोलापुरातील ओंकार आपटरमेंट मध्ये ते राहत होते. त्यांच्या पाश्च्यात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी ३० जून रोजी एका वाहनाच्या धडकेत त्यांच्या मेंदूला मोठी दुखापत झाली होती. त्यांना लागलीच उपचारासाठी रुग्नालयात दाखल केले होते. परंतु शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी हजारो श्री सदस्यांनी त्यांचे अंतिमदर्शन घेतले. श्री सदस्यांनी यावेळेस साश्रू नयनांनी आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. त्यांच्या अचानक जाण्याने अनेक श्री सदस्यांच्या मनावर आघात झाला. यावेळी त्यांचा अंत्यविधी नामस्मरणाने पार पडला.




















