
जळगाव मिरर | ९ मे २०२५
जळगाव नगरपालिका असताना खाजामिया झोपडपट्टी व भीमनगर भागातील रहिवाशांचे पुनर्वसन करताना त्यांना छत्रपती शिवाजीनगरमधील घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्यात आली होती. मात्र, घरकुल वाटपाच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता घडली. त्या वेळचे शहर अभियंता श्री. सोनगिरे यांनी घरे वाटप करताना योग्य ती शहानिशा न करता सर्व कागदपत्रे राजू रतन सोनवणे नावाच्या एका व्यक्तीच्या हाती सुपूर्द केली होती. सोनवणे या व्यक्तीने त्या घरावर अनधिकृत ताबा मिळवून ते घरकुल भाड्याने दिले, आणि आजपर्यंत घराचे भाडे कमवत आहे. त्यात खरा लाभार्थी – ही वृद्ध महिला – वंचितच राहिली. तिने वेळोवेळी महानगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. मात्र, प्रत्येक वेळी तिला चालढकलच मिळाली.
आज, ९ मे २०२५ रोजी, त्या आजीने थेट महानगरपालिका गाठून, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. “आमच्याकडून नुसते अंगठे घेतले, ताबा पावती न देता सर्व अधिकार सोनवणे नावाच्या लीडरला दिले. इतकी वर्षे आम्ही वाट पाहतोय. आम्हाला आमचं हक्काचं घर मिळेल की नाही?” असा त्यांनी थरथरत्या आवाजात प्रश्न विचारला. हा प्रकार केवळ व्यक्तीगत अन्याय नाही, तर संपूर्ण घरकुल योजनेवर प्रश्नचिन्ह उभा करणारा गंभीर घोटाळा आहे.
महानगरपालिकेकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.आज दिनांक 9 मे 2025 रोजी 80 वर्षीय वृद्ध महिलेने महानगरपालिका गाठून सेवानिवृत्त शहर अभियंता सोनगिरे यांना आयुक्तांच्या दालनातच आपबिती सांगितली , आमचे नुसते कागदांवर अंगठे घेऊन ताबा पावती आम्हाला न देता सोनवणे नामक लीडरच्या हातात दिले. व सोनवणे नावाची व्यक्तीने अनधिकृत कब्जा केलेला असताना वेळोवेळी नगरपालिका असताना व महानगरपालिका यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आजपर्यंत आमच्या पत्रव्यवहारची आम्हाला चाल ढकल करून इतके वर्ष वाट पाहायला लावली आहे. कब्जा धारक राजू रतन सोनवणे बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कायम कर्मचारी म्हणून कार्यरत आहे . या व्यक्तीची मागासवर्गीय संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झालेली आहे, पण हा व्यक्ती तर मागासवर्गीय लोकांवरच अन्याय करत आहे. असे चित्र दिसत आहे, माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरात माझे मरण तरी होईल का, असे वृद्ध महिला वत्सलाबाई सोनवणे यांनी मनपा आयुक्त ढेरे यांना जाताना बोलल्या.