जळगाव मिरर । ५ जानेवारी २०२३
देशात मोठ्या वेगात महागाई होत आहे.आता नवीन वर्ष सुरू झाले असताना आता तरी जनतेची महागाईतून सुटका होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आज, ५ जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा फटक पेट्रोल- डिझेलच्या किमतींना बसतो. परिणामी महागड्या पेट्रोल आणि डिझेलचा झटका जनतेला बसणार का? मात्र आज महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासा देणार बातमी आहे, ती म्हणजे देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
चार महानगरांमध्ये 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत
दिल्ली – पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर, डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किमती 0.80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर प्रति बॅरल $ 73.42 वर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.68 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून ती 78.37 टक्क्यांवर पोहोचली आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर ‘असे’ तपासा
भारतातील सरकारी तेल कंपन्या देशातील विविध राज्ये आणि शहरांनुसार दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. यासाठी तुम्हाला कंपन्यांना एसएमएस पाठवावा लागेल. HPCL ग्राहकांची नवीन किंमत तपासण्यासाठी, HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइलच्या ग्राहकांना RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवणे आवश्यक आहे. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> 9223112222 वर पाठवतात. यानंतर तेल कंपनी ग्राहकांना मेसेज करून पेट्रोल-डिझेलची किंमत सांगेल. अशा प्रकारे तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर कळू शकतात.