• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2026
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
Share on FacebookShare on Twitter

२२ वर्षांच्या संशोधनानंतर मोठे यश; स्वस्त आणि अधिक कार्यक्षम इंधनाचा मार्ग मोकळा

जळगाव मिरर | १४ मार्च २०२६

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे सध्या जगभरात इंधन संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतातही अनेक ठिकाणी गॅससाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे, तर हॉटेल आणि खाद्यव्यवसायावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील शास्त्रज्ञांनी दिलासादायक संशोधन यशस्वी केले आहे. एलपीजीला पर्याय ठरू शकणाऱ्या ‘डायमिथाईल इथर’ (DME) या गॅसच्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यात एनसीएलच्या संशोधकांना यश आले आहे.

एनसीएलमधील शास्त्रज्ञ डॉ. तिरुमलाईस्वामी राजा आणि त्यांच्या संशोधन पथकाने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ संशोधन करून या गॅसच्या निर्मितीसाठी लागणारा महत्त्वाचा ‘उत्प्रेरक’ (कॅटॅलिस्ट) प्रयोगशाळेत तयार केला आहे. या उत्प्रेरकाच्या मदतीने ‘डीएमई’ गॅसची निर्मिती शक्य झाली असून सध्या पायलट प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज सुमारे २५० किलो गॅस तयार केला जात आहे.

या तंत्रज्ञानाच्या आधारे औद्योगिक कंपन्यांसोबत करार करून मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले, तर देशातील इंधनाच्या गरजेपैकी सुमारे १० ते २० टक्के गरज पूर्ण होऊ शकते, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. यामुळे इंधनासाठी परदेशांवर असलेले भारताचे अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यानंतर या गॅसची किंमत एलपीजीपेक्षा कमी असेल, असा विश्वासही शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी सांगितले की, ‘डीएमई’ या इंधनाचे उत्पादन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. डॉ. तिरुमलाईस्वामी राजा यांच्या नेतृत्वाखाली २००४ साली या संशोधनाची सुरुवात झाली होती. तब्बल २२ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर २०२६ मध्ये हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उत्पादनासाठी सज्ज झाले आहे. या संशोधन प्रक्रियेदरम्यान सहा पेटंट्सची नोंदणी करण्यात आली आहे.

‘डीएमई’ गॅस तयार करण्याची प्रक्रिया देखील पर्यावरणपूरक आहे. शेतीतील कचरा किंवा जैवइंधनापासून (बायोमास) प्रथम मिथेनॉल तयार केले जाते. त्यानंतर रासायनिक प्रक्रियेद्वारे त्यापासून ‘डायमिथिल इथर’ तयार केला जातो. या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका एनसीएलने विकसित केलेल्या कॅटॅलिस्टची असते.

सध्या भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर एलपीजी आयात करतो. २०२४ मध्ये देशाने सुमारे २.१ कोटी टन एलपीजीची आयात केली होती. अशा परिस्थितीत ‘डीएमई’ गॅस हा एलपीजीला प्रभावी पर्याय ठरू शकतो. शिवाय हा गॅस एलपीजीपेक्षा सुमारे दीडपट अधिक कार्यक्षम असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात स्वस्त, स्वदेशी आणि पर्यावरणपूरक इंधन म्हणून ‘डीएमई’ गॅस महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

Related Posts

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला
जळगाव

रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला

March 14, 2026
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026
एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!
जळगाव

एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार; ४१३ पैकी २९६ संपर्क क्रमांक बंद!

March 13, 2026
मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !
क्राईम

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार मोठी कारवाई:शिक्षण मंत्र्यांची घोषणा !

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group