जळगाव मिरर | १९ ऑगस्ट २०२३
राज्यात गेल्या काही महिन्यापासून भारत राष्ट्रीय समिती अनेक जिल्ह्यात ॲक्शन मोडवर येत माजी नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश करून घेत आहे तर आगामी होणाऱ्या निवडणुकीत देखील जय्यत तयारी केली असून जळगाव जिल्ह्यात देखील या पक्षाला लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर हा नेता हाती लागला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यातील बीआरएस पक्ष मोठ्या ताकदीने राजकीय गणित आखून जिल्ह्यात भरारी घेण्याच्या तयारीत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव हे राज्यात मोठी ताकद आजमविताना दिसत असून त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचा भव्य रोडशो यासह दिग्गज राजकारण्यांना आपल्या गळाशी लावून भविष्यातील निवडणूक जिंकण्याच्या तयारीत ते मैदानात उतरलेले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील त्यांनी हेच बघून. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांना आपल्या जाळ्यात घेऊन राजकीय पक्षात प्रवेश करून जळगाव जिल्ह्यात देखील पक्षाची मुहूर्तमेढ लक्ष्मण पाटलांच्या हस्ते रोवत असल्याचे चित्र त्यांच्या प्रवेशावरून दिसू लागले आहे. पाटील यांच्या प्रवेशाने भविष्यातील जळगाव जिल्ह्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
यांनी केला प्रवेश
लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांच्यासोबत भगवान धनगर, प्रमोद झंवर, गणेश पाटील, संदीप पाटील, माणिकराव कदम यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.