जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५
अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथील एका महिलेला विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना दि.६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
लताबाई भाऊसाहेब पाटील (वय ३९) ही घराच्या मागच्या बाजूस पाण्याच्या मोटरला पिन लावायला गेली असता विजेचा शॉक लागला आणि ती खाली पडली. तिला तातडीने पातोंडा आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे आणल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तारकेश्वर गांगुर्डे यांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.
