• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे – रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
महिलांनी स्व संरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा व्हावे – रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२४

स्त्री ही आधुनिक युगातील दुर्गा असून ती स्वयंपाक, घरकाम, नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळते परंतु आजकाल महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून माता महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.

नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे अध्यक्ष असलेल्या संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे मुक्ताईनगर येथे ‘नव दुर्गेची नऊ रूपे’ या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रात देवीचा शक्ती स्वरुपात सर्वत्र मुक्त संचार असल्याचे मानले जाते म्हणून यावेळी देवीची म्हणजे  शक्तीची उपासना केली जाते म्हणून नवरात्रीला शक्तिदेवतेचा उत्सव म्हटले जाते. नवरात्रात शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप केले जातात. या रूपांची सर्वांना ओळख व्हावी व परिसरातील मुलांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी संवेदना फाउंडेशनतर्फे ‘नव दुर्गेची नऊ रूपे’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रकला स्पर्धेत नऊशे स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी स्पर्धकांनी देवीच्या रूपांचे  उत्कृष्ठ चित्र रेखाटले आहेत यातून नक्कीच भविष्यातील उत्तम कलाकार घडतील असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला. स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना बक्षीस देउन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या, की नवरात्र उत्सव हा शक्तीचा उत्सव आहे या उत्सवात आपण आदिशक्ती दुर्गा मातेच्या विविध रूपांची उपासना करतो स्त्री ही आजच्या आधुनिक युगातील दुर्गा असून ती स्वयंपाक, घरकाम, नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत असते. दुर्गा मातेने महिषासुराचाआणि असुरांचा वध करून संकट दूर केले तसेच प्रसंगी स्त्री दुर्गेचा अवतार घेऊन आपल्या परिवारावर आलेल्या संकटांत खंबीर भूमिका घेऊन संकट दूर करत असते परंतु आजकाल समाजात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत अत्याचाऱ्यांची विकृत मानसिकता ठेचून काढण्यासाठी सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वयंसिद्धा बनून महिषासुर मर्दिनी दुर्गा मातेचा अवतार धारण करण्याची वेळ आली आहे तेव्हाच वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांना लगाम बसेल.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जे.ई. स्कुलचे मुख्याध्यापक नितीन भोंबे, कला शिक्षक सुरवाडे, व्ही एम चौधरी, व्ही डी पाटील, नितीन ठाकूर, भगवान कोल्हे व इतर शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group