
जळगाव मिरर / २६ फेब्रुवारी २०२३
प्रत्येकाच्या घरातील नियमित असणारा प्रश्न म्हणजे जेवण काय व काय बनवायचे, या बातमीतुन तुमच्या घरातील एका वेळेस जेवण काय बनवायचे हा प्रश्न सुटणार आहे. नेहमी सकाळी आपण नास्ता करीत असतो अशावेळी तुम्ही या पदार्थाचा नास्त्यासाठी उपयोग करू शकतात.त्यामुळे महिलांची एका दिवसाची चिंता नक्की मिटणार आहे. बऱ्याचदा घरी बनवलेला भात जास्त होऊन जातो किंवा कोणी खाल्ला नाही म्हणून उरून जातो अश्यावेळी काय करायचं एकतर तो फेकून दिला जातो किंवा दुसऱ्या दिवशी परतून डब्ब्यात दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, उरलेल्या भातापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जाऊ शकतात, आणि तेही अवघ्या काही मिनिटांत.
चला तर मग आज जाणून घेऊया, उरलेल्या भातापासून कुरकुरीत खमंग मेंदू वडे कसे बनवायचे?
साहित्य
शिजवलेला भात, उरलेला भात
पाव वाटी दही
पाव वाटी रवा
किसलेलं आलं
पाव वाटी बारीक चिरलेला कांदा
कढीपत्ता
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
फ्रुट सॉल्ट/ इनो
तांदळाचं पीठ
तळण्यासाठी तेल
कृती
अवघ्या काही मिनिटांत मेंदू वडा बनवण्यासाठी सर्वात आधी शिजवलेला भात, दही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. चांगली पेस्ट बनवल्यानंतर ते मिश्रण एका खोलगट भांड्यात काढून घ्या.
आता यामध्ये रवा , हिरवी मिरची बारीक कापलेली, कापलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, तांदळाचं पीठ इनो, मिरपूड, आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या.
हाताला पाणी आणि तेल लावून घ्या. आणि वाडयांना आकार द्या. लक्षात असुद्या हे मिश्रण हे घट्टसर असुद्या
वड्यांना आकार देताना हे मिश्रण हातावर सपाट करून घ्या. त्यामध्ये एक छिद्र करा आणि ते तेलात हळुवार सोडून द्या.
हे वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम होऊद्या आणि मगच वडे टाळायला घ्या. माध्यम आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगले तळून घ्या
तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या आणि खोबरीच्या चटणीसोबत किंवा सांबर सोबत गरमागरम वड्यांची मजा घ्या.






















