जळगाव मिरर । ७ जानेवारी २०२३
राज्यात शिंदे गट व ठाकरे गट एकमेकावर कुरघोडी करीत राजकारण करीत असतांना शिंदे गटाच्या एका मंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कौतुक केल्यानंतर राज्यातील राजकारणात आता शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येईल असे संकेत दिसत होते. पण यावर आता शिंदे गटाच्या आमदाराने खुलासा केला आहे कि हे दोन गट कधी एकत्र येणार हे सांगतिले आहे.
शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करण्यात आल्याने आणि त्यांनी केलेल्या एका विधानाने शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागल्या आहे. पण यावरच बोलतांना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मात्र मोठं विधान केले आहेत. ‘जोपर्यंत संजय राऊत आहेत तोपर्यंत शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार नाही, हे माझ्याकडून लिहून घ्या’ असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. म्हणजेच जेव्हा संजय राऊत ठाकरे गटात नसतील तेव्हा शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दीपक केसरकर यांच्या विधानानंतर शिंदे-ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाला उत्तर देतांना शिरसाट म्हणाले की, दीपक केसरकर हे सॉफ्ट प्रवक्ते असून, भांडण नको असे त्यांची आजही भूमिका आहे. ते अहिंसावादी नेते आहेत. परंतु त्यांना माहीत नाही की, संजय राऊत यांना एकत्र येऊ देणार नाही. जोपर्यंत संजय राऊत आहेत तोपर्यंत शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार नाहीत हे माझ्याकडून लिहून घ्या असा दावा शिरसाट यांनी केला. तर आम्ही त्याचवेळी एकत्र येऊ शकत होतो, पण ती वेळ आता निघून गेली आहे. तसेच आज जर ठाकरे गटाची ऑफर आली तर याचा योग्य तो निर्णय एकनाथ शिंदे घेतील असेही शिरसाट म्हणाले. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूरच्या कशेडी घाटात टँकरने मागून धडक दिल्यानं अपघात झाला. दरम्यान यावर बोलतांना शिरसाट यांनी देखील या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघाताचा घटनाक्रम पाहिल्यास कदम यांच्या गाडीच्या मागे असलेल्या पोलिसांच्या गाडीला ओव्हरटेक करून ट्रक हा कदम यांच्या गाडीला धडक देऊन पुढे निघून गेला. त्यामुळे असा अपघात करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर याची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली पाहिजे. तसेच स्थानिक राजकारणाबद्दल मी सांगू शकत नाही, पण योगेश कदम यांना अनेक वेळा ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या माध्यमातून धमक्या आल्याचं शिरसाट म्हणाले. त्यामुळे शंकेची पाल तिकडे जाते असेही शिरसाट म्हणाले.
