जळगाव मिरर / २७ फेब्रुवारी २०२३ ।
आपल्या परिवारात अनेक सणाला किवा काही लग्नकार्यात आपण सोन्याची खरेदि करीत असतो तर कधी कधी वेळ आली तर आपल्या कुठल्याही बँकेकडून कर्ज घ्यावे लागत असते. पण आपल्याकडील काही निकषावर आपल्याला कर्ज मिळत असते व त्यातून आपले समाधान होत नाही, त्यामुळे तुमच्या परिवारात असलेल्या सोन्याच्या दागिन्यावर तुम्हाला आता कोट्यावधी रुपयाचे कर्ज मिळू शकते.
अशा काही बँका आहेत ज्या तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकतात आणि त्यासाठी तुमच्याकडून कोणतीही कागदपत्रे घेतली जाणार नाहीत. गोल्ड लोन कॉमर्शिय, पर्सनल, एज्युकेशन, हेल्थ केअर, शेती आणि इतर कारणांसाठी दिले जाते. कर्ज देणारी संस्था सोन्याच्या सध्याच्या बाजारभावानुसार कर्जाची रक्कम देते.
तुम्हाला गोल्ड लोनसाठी अर्ज करायचा असल्यास, तुम्ही येथे सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेऊ शकता. प्रथम तुम्हाला जिथून कर्ज घ्यायचे आहे ती बँक निवडा. तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेणार आहात ती बँक तुम्हाला चांगल्या व्याजाने कर्ज देईल आणि कर्जाची रक्कम परत केल्यानंतर दागिने परत करेल याची खात्री करा. बँक निवडल्यानंतर, तुमच्या सोन्याचे मूल्यांकन करा. अनेक बँका तुम्हाला या ऑफर देतात. बँकेच्या शाखेत जाऊन हे काम करता येईल. यामध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सोन्याचे वजन केले जाईल.आता बँक तुम्हाला कर्जाची रक्कम, व्याजदर आणि त्याच्या अटींची माहिती देईल. तुम्ही इतर बँकांशी तुलना करून गोल्ड लोन घेऊ शकता. संपूर्ण कर्जाची परतफेड कर्जाची मुदत संपल्यानंतर किंवा कालावधीच्या मध्यभागी एकरकमी केली जाऊ शकते. संपूर्ण अटी मान्य केल्यानंतर तुम्हाला कर्ज दिले जाईल.