जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४
येथील विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची पक्ष संघटन विस्तार, केंद्रीय स्तरावरून होणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी यासह विकासात्मक अनेक विषयांवर संवाद साधला.
युवा उद्योजक तथा विजया केसरी प्रतिष्ठानचे संचालक अविनाश पाटील जाधव यांनी सामनेर येथील रवींद्र तापीराम पाटील, भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, ॲड. योगेश पाटील, जिल्हा सहकार बोर्डाचे माजी प्रभारी अध्यक्ष सतीश बापू शिंदे, भडगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष नूतन पाटील, संघाचे कार्यकर्ते मनीष काबरा आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. तसेच संघाचे पदाधिकारी सुनील सराफ, डॉ. निलेश पाटील पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला