जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२३
केसीई सोसायटीच्या एम जे कॉलेजच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा दुसरा दिवस हा विविध व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी गाजला. गीतगायन,नृत्य स्पर्धा व भारतीय पारंपरिक वेशभूषा या स्पर्धांनी गाजला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नटराजन पूजन व रंगमंचाच्या पूजाने व वंदनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन भारंबे यांच्या हस्ते नटराजन पूजा व रंगमंचाची पूजा करण्यात आली. यावेळी महाविद्यालच्या उपप्राचार्य प्रा करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा आर बी ठाकरे, समन्वयक प्रा स्वाती बऱ्हाटे , प्रा उमेश पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा महेंद्र राठोड व उपप्रमुख प्रा शोभना कावळे उपस्थित होते.
गीतगायनाच्या स्पर्धेची सुरुवात ही गणेश वंदनाने करण्यात आली. रंगतदार झालेल्या कार्यक्रमांमध्ये गायत्री बाविस्कर हिने गायलेल्या ‘चुडी जो खनके’ या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर कृतिका कुलकर्णी हिने गायलेल्या ‘छम छम छम’ व समर्थ शिरसाळे यांनी गायलेल्या ‘मै निकला गड्डी लेके’ या गाण्याने सर्वांची मने घेतली. त्याचप्रमाणे रेणुका माळी ‘झुमका वाली पोर’ या अहिराणी गीताने, अविनाश सपकाळे याने गायलेल्या झिंग झिंग झिंगा आणि नीरज शिरसाठ व वैशाली मतलाबी यांनी गायलेल्या ‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ या गीतांवर सर्व प्रेक्षकांनी ठेका धरला . वाद्यवादन स्पर्धेत कुशलपाल पाटील या विद्यार्थ्याच्या सुरेल बासुरीवादनाने प्रेक्षकांना रममाण करून टाकले. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सुभाष तळेले व स्वरदा संगीत विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कपिल शिंगणे यांनी कामकाज बघितले .
यानंतर घेण्यात आलेल्या भारतीय प्रादेशिक पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतातील राज्यात असलेल्या विविध संस्कृतीचे दर्शन यावेळेस बघण्यास मिळाले. यावेळेस महाराष्ट्र , गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू , कर्नाटक व गुजराथी पोशाख परिधान केलेल्या स्पर्धकांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून डॉ उज्वला भिरुड व अंजली तिवारी यांनी कामकाज पाहिले.
नृत्यप्रकार या स्पर्धेची सुरुवात देशभक्तीपर नृत्याने वंदनाने झाली .यामध्ये समूह नृत्य व सोलो नृत्य यांचा समावेश होता .सोलो प्रकारात सुचिता बडगुजर हिच्या ‘आजा नचले’ या गाण्यावर व नावेद खान पठाण यांनी ‘बचना या हसीनो’ या गीतावर मनमोहक नृत्य केले . सिद्धांत नन्नवरे ह्याने ‘वाजले की बारा’ या गाण्यावर नृत्य केले .या नृत्यप्रकारामध्ये वैशिष्ट्यपूर्ण झालेल्या नृत्यांनी सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवले. समुहनृत्य प्रकारामध्ये ‘खलासी ग्रुप’ व ‘अहिराणी ग्रुप’ यांनी प्रेक्षकांना ठेका धरण्यास प्रवृत्त केले . ‘जोगवा’ व ‘पावरा नृत्य’ या लोकनृत्यांनी सर्व कार्यक्रमांमध्ये रंगत आणली. न्यृत्य स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री देव जाधव व सौ रमा करजगावकर यांनी कामकाज पाहिले.
यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. लक्षवेधक लेझिम पथकाने पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रा योगेश धनगर व प्रा किरण कोळी यांनी लेझिम पथकाला मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ लेखापरिक्षक लेखाधिकारी मा. रविंद्र घोंगे व केसीई सोसायटीचे सचिव मा ॲड प्रमोद पाटील उपस्थित होते. ‘ प्रिन्सिपल रोल ऑफ ऑनर’ ने इ १२ वी कला शाखेची विद्यार्थीनी गीता पंडित ,इ १२ वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रतिक वाणी,इ १२ वी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी भैरव भंगाळे व इ १२ वी किमानकौशल्य शाखेचा विद्यार्थी रामकृष्ण सपकाळे या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. काव्यवाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कावेरी गीते, द्वितीय क्रमांक कोमल शिरसाळे व तृतीय क्रमांक निदा पोची यांनी मिळविला. उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत चेतन सोनवणे, व्दितीय क्रमांक वैशाली रावतोळे व तृतीय क्रमांक प्रणिता काटोले यांनी मिळविला. विविध छंद व ललित कला प्रकारात पेंटिंग्जमध्ये हर्षल महाजन याने प्रथम क्रमांक , मृणाल राजपूत हिने व्दितीय व जिज्ञासा मंधवाणी हिने तृतीय क्रमांक पटकावला. टॅटू स्पर्धेत योगेश्वरी पाटील हिने प्रथम क्रमांक , व्दितीय क्रमांक संजना कनोजिया व सिद्धांत नन्नवरे ह्याने तृतीय क्रमांक मिळविला. स्केचेस स्पर्धेत प्रथम क्रमांक वैष्णवी शिंपी व मानसी नाथजोगी व्दितीय क्रमांक मृणाल राजपूत व माधुरी पाटील व तृतीय क्रमांक किमया खडके यांनी मिळविला. मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक भुमी जोशी व्दितीय क्रमांक लक्ष्मी भावरानी व तृतीय क्रमांक आलिया जहांगिरदार व निदा पोची यांनी मिळविला. रांगोळी स्पर्धत प्रथम क्रमांक हेतवी तळेले व्दितीय क्रमांक सृष्टि पाटील व तृतीय क्रमांक फाल्गुनी चौधरी व मानसी निकम यांनी मिळविला. पूजाथाली स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रतिक्षा सपकाळे व्दितीय क्रमांक प्रांजली खैरनार व तृतीय क्रमांक वैष्णवी सोनार यांनी मिळविला. हॅण्डक्राफ्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहल चौधरी, व्दितीय क्रमांक दिशा जोशी व तृतीय क्रमांक चंदन बारी यांनी मिळविला. फुलांच्या रांगोळीमध्ये प्रथम क्रमांक कोमल इकडे, व्दितीय क्रमांक श्रृती चोरडिया व तृतीय क्रमांक फाल्गुनी चौधरी व जान्हवी वराडे यांनी मिळविला. संस्कार भारती मध्ये प्रथम क्रमांक सुजल नारखेडे, व्दितीय क्रमांक कोमल इकडे व तृतीय क्रमांक प्रिया जाधव यांनी मिळविला. फूडफेस्टीवल स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची पांडे व स्नेहा साम, व्दितीय क्रमांक श्रेयस शुक्ल व सौम्य भारूळे तृतीय क्रमांक रिद्धी कुलकर्णी व कल्याणी आठवले यांनी मिळविला. गरबा स्पर्धेत गरबा किंग शंकर ललवाणी तर गरबा क्वीन अलका गरडा यांची निवड झाली.
हास्यप्रधान खेळांत फ्रॉग रेस स्पर्धेमध्ये रोहित पावरा व नेहा चव्हाण यांनी तर वॉटर फिलिंग स्पर्धेत देवेंद्र शिर्के व तेजल बाविस्कर यांनी बाजी मारली. कार्ड रेस स्पर्धेत रोहित पावरा व वैष्णवी शिंपी हे विजेते ठरले. मटकी फोड स्पर्धेत भावेश सोले व रोशनी चव्हाण हे विजयी ठरले. शक्तीमान रेसमध्ये भाग्यश्री दुसाने विजयी ठरले.
गीतगायन स्पर्धेत एकल स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ शिरसाळे, व्दितीय क्रमांक गायत्री बाविस्कर व तृतीय क्रमांक सेजल मिश्रा यांनी मिळविला. युगल प्रकारात नीरज शिरसाठ व वैशाली मतलबे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. वाद्यवादन स्पर्धेत कुशलपाल पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला.
नृत्यप्रकारात एकल प्रकारात प्रथम क्रमांक राहुल यादव व्दितीय क्रमांक . अनुश्री सावकारे व तृतीय क्रमांक क्रांती पाटील यांनी मिळविला. युगलप्रकारात प्रथम क्रमांक सिद्धांत नन्नवरे व वैष्णवी पावरा, व्दितीय क्रमांक नावेद खान पठाण व रौनक तडवी व तृतीय क्रमांक सुचिता बडगुजर व स्निग्धा लेले यांनी मिळविला. समूह नृत्य प्रकारात खलासी गृपने प्रथम क्रमांक पटकावला तर व्दितीय क्रमांक पावरा गृपने पटकावला. तृतीय क्रमांक टुकूर टुकूर ग्रुपने तर चतुर्थ अहिराणी गृपने मिळविला.
भारतीय प्रादेशिक पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षांजली शिंपी, व्दितीय खुशी शेकोकार व धनश्री माळी, तृतीय क्रमांक डिम्पल पाटील व भुमिका पाटील यांनी मिळविला.
यावेळी वेगवेगळ्या खेळप्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ सं ना भारंबे, उपप्राचार्य करुणा सपकाळे , पर्यवेक्षक प्रा आर बी ठाकरे, समन्वयक प्रा स्वाती बऱ्हाटे ,उमेश पाटील, सनेहसंमेलन प्रमुख प्रा महेंद्र राठोड व उपप्रमुख शोभना कावळे उपस्थित होते.पारितोषिक वितरण समारंभाचे सुत्रसंचालन डॉ श्रध्दा पाटील , प्रा छाया चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा गणेश सुर्यवंशी यांनी केले.