
पारोळा : प्रतिनिधी
तालुकयातील भोकरबारी धरणात एक ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ९ मंगळवार रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.सकाळी कामाला जातो असे सांगून निघाला परंतु सायंकाळी भोकरबारी धरणात त्याचा मृतदेह तरंगत होता.
येथील न्हावी गल्लीतील रहिवासी आशिष शिंपी कापड दुकानावर कामाला हाेता. ताे काही दिवसांपासून व्यसनाधीन हाेऊन नैराश्यात होता. आई धुणेभांडी करून चरितार्थ चालवत हाेती. त्याची पत्नी माहेरी निघून गेल्यापासून तो अधिक व्यसन करत होता. ९ रोजी तो कामावर जातो असे सांगून गेला. परंतु घरी परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेत असताना भोकरबारी येथील धरणात ९ रोजी सायंकाळी तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे काही तरुणांनी पाहिले. त्याची ओळख पटून तो आशिष हाच असल्याचे समजले. तो धरणावर कसा गेला, त्याचा पाय घसरला की त्याने उडी मारून आत्महत्या केली, याची माहिती मिळालेली नाही.




















