• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

आता सेलिब्रिटींनाही मिळणार दंड ; न्यायालयाचा आदेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 17, 2022
in वाणिज्य
0
आता सेलिब्रिटींनाही मिळणार दंड ; न्यायालयाचा आदेश
Share on FacebookShare on Twitter

रशियाची माजी टेनिस स्टार मारिया शारापोवा आणि फॉर्म्युला वनचा माजी रेसर मायकल शुमाकर यांच्यावर फसवणूक आणि दिशाभूल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील एका महिलेच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशानंतर शारापोवा आणि शूमाकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बिल्डरच्या माहितीपत्रकात शारापोवा आणि शूमाकर यांची नावं पाहून 2013 मध्ये रिअल इस्टेट कंपनी रिअलटेक डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली होती, असा आरोप या महिलेनं केला आहे. या जाहिरातीत शारापोव्हाने सोसायटीत टेनिस अकादमी आणि स्पोर्ट्स स्टोअर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन थाप निघाली. याशिवाय मायकल शूमाकर वर्ल्ड टॉवर असे नाव असलेल्या टॉवरच्या उभारणीचीही चर्चा होती. जाहिरातींमध्ये त्याची चर्चा झाली. हा प्रकल्प 2016 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप या प्रकल्पाला मुहूर्त लागलेला नाही.
रिअल इस्टेट क्षेत्र विक्री आणि स्वतः चा ब्रँड तयार करण्यासाठी सेलिब्रिटी एंडोर्समेंटवर अवलंबून आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकरणांमध्ये सेलिब्रिटींवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी आम्रपाली ग्रुप प्रकरणात क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचं नाव समोर आलं होतं. धोनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धोनी हा आम्रपाली ग्रुपचा ब्रँड ॲम्बेसेडर होता आणि त्यामुळेच तो या प्रकरणात अडकला होता. धोनीची प्रतिमा पाहता लोकांनी आम्रपाली ग्रुपवर विश्वास ठेवून त्यात गुंतवणूक केली.
नवीन ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत उत्तरदायित्व निश्चित होणार
नवीन ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अंतर्गत, सेलिब्रिटी एंडोर्समेंटची जबाबदारी निश्चित केली गेली आहे. नव्या कायद्यात दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या जाहिरातींवर कारवाई करण्याची तरतूद आहे. ग्राहकांना आमिष दाखविण्यासाठी अथवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या तर कंपनीबरोबरच सेलिब्रिटींवरही कारवाई करण्यात येईल, अशी तरतूद कायद्यात असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्यास कंपन्यांना दंड भरावा लागू शकतो तर सेलिब्रिटींना तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
ग्राहक संरक्षण कायदा हा भारतातील ग्राहकांना संरक्षण देणारा एक प्रमुख कायदा आहे. हा कायदा सन 1986 मध्ये सादर करण्यात आला आणि त्यानंतर ग्राहक संरक्षण दुरुस्ती कायदा, 2002 अन्वये त्यात सुधारणा करण्यात आली.
तर खावी लागेल हवा
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित गुन्ह्यात प्रथमच दोषी आढळल्यास 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद नव्या ग्राहक संरक्षण कायद्यात करण्यात आली असून, त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. तर अशीच फसवणूक पुन्हा केल्यास दंडाची रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत वाढते. तर शिक्षेत वाढ होऊन ती 5 वर्षे होते. दोषींना 5 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागतो.
कायदेतज्ज्ञांच्या मते, एखादे उत्पादन वादात सापडल्यास ब्रँड अॅम्बेसेडरही दोषी ठरतो. कारण एखाद्या ब्रॅण्डची जाहिरात करण्यापूर्वी अथवा त्याच्याशी करार करण्यापूर्वी, संबंधित भूमिका स्वीकारण्यापूर्वी सेलिब्रिटींनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जाहिरातीची जाहिरात करण्याआधी जाहिरातीत केलेला दावा तपासून पाहण्याची जबाबदारी सेलिब्रिटीची असते. नव्या कायद्यात उत्पादनाशी संबंधित कोणतीही चुकीची माहिती ती जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटीला अडचणीत आणू शकते आणि गजाआड ही करु शकते.

Related Posts

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !
राजकीय

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
जळगाव

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

जळगावमध्ये बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी : मोफत कौशल्य प्रशिक्षण, नोकरी आणि उद्योगाची हमी!

March 18, 2026
भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

भूमी सुपोषण, संवर्धन अभियानाचा उद्या शुभारंभ !

March 18, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group