मनविसेची कार्यकारिणी लवकर जाहीर होणार
जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबई येथील ‘शिवतिर्थ’ निवासस्थानी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची भेट घेवून जळगाव जिल्ह्याची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी अमित ठाकरे यांचा सत्कारही मनविसे पदाधिकाऱ्यांनी केला.
यावेळी बैठक चर्चेदरम्यान ठरले की, पुढील एप्रिल महिन्यात मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण जळगाव जिल्हा मनविसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहे. ते आमंत्रण अमित ठाकरे यांनी स्विकारले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन कार्यकारणी होणार जाहीर
जळगाव जिल्ह्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जम्बो कार्यकारिणी अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील महिन्यात होणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यांनी घेतली भेट
मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांची मनविसे जिल्हा पदाधिकारी योगेश पाटील, पंकज चौधरी, चेतन पाटील, कुणाल पवार या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून बैठक संपन्न झाली.