अमळनेर : प्रतिनिधी
आशीर्वाद नगर मधील रहिवासी वैभव किशोर मगर हा विद्यार्थी एमजीएम मेडिकल कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट औरंगाबाद यातून उत्तीर्ण झाला असून तो डांगरी येथील प्राथमिक शिक्षक किशोर खंडेराव मगर, उपशिक्षिका उषा किशोर मगर यांचा लहान चिरंजीव असून झाडी येथील मुख्याध्यापक मनोहर मगर यांचा पुतण्या आहे. त्यानिमित्ताने ढेकूरोड परिसरवासीयांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी विठ्ठल पाटील, एस आर पाटील, संजय पवार, दिलीप पाटील, आधार पाटील, गोकुळ पाटील, प्रवीण पवार, सुधाकर धोबी, राजेंद्र जैन, रवींद्र सनेर, कैलास सनेर, निलेश पाटील फाफोरेकर, अविनाश मगर, विजयसिंह पवार, परेश मगर, संजय पाटील आदींनी घरी जाऊन त्याचा गौरव करत पुढील शिक्षणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वैभवने यशाचे श्रेय त्याच्या आईवडीलां दिले.