मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाची अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. कतरिनाने लग्नानंतरचा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘फोन भूत’ आहे.
https://www.instagram.com/p/CfVnF4OtlWf/?utm_source=ig_web_copy_link
कतरिना कैफने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. चित्रपटाची पोस्ट शेअर करत कतरिनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘फोन भूतच्या जगात तुमचे स्वागत आहे. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार असून यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळणार आहे.





















