
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या क्षितिज युवा फाउंडेशनची नुकतीच जिल्हा बैठक शहरातील पद्मालाय रेस्ट हाउस उत्साहात झाली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी यांनी येणाऱ्या काळातील विविध उपक्रमाची माहिती दिली.
सविस्तर वृत्त असे की, दि १५ रोजी क्षितिज युवा फाउंडेशनच्या बैठकित येणाऱ्या 3 जून 2022 रोजी क्षितिज फाउंडेशन व स्व. गोपिनाथरावजी मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, एरंडोल, अश्या ठिकाणी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानुसार भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
तसेच क्षितिज फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील दुर्बल गरजू लोकांना शासकीय योजनाचा लाभ मिळावा या उद्देशाने जळगाव शहरातील ९ प्रभागात शासकीय योजना शिबीर राबविण्यात येणार आहे. यावेळी बैठकीला गजानन वंजारी, शुभम ईश्वरे, हर्षल दूसाने, विवेक पवार, तेजस वाघ,अविनाश पारधे, अक्षय मेघे, ऋषिकेश चाटे , गौरव घुगे, धिरज नाईक, तेजस घुगे, वैभव वाघ, किरण नाईक, उपस्थित होते.






















