जळगाव : प्रतिनिधी
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी होत आहे. या चौकशीच्या निषेधार्थ आज जळगावात काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन पक्ष कार्यालयासमोर करण्यात आले.
केंद्रातील मोदी सरकार तपास यंत्रणाचा दुरोपयोग करून देशातील महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, मनमानी पद्धतीने चालविलेले खाजगीकरण या विरोधात आवाज उठविणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष माननीय सोनियाजी गांधी यांची ED च्या माध्यमातून नाहक चोकशी करून त्रास देण्याचा प्रकार चालू आहे, त्या विरोधात आज जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून प्रदेश उपाध्यक्ष डॉ उल्हासदादा पाटील, प्रदेश सचिव विनोद कोळपकर, शहर जिल्हा अध्यक्ष शाम तायडे यांच्या नेतृवात काँग्रेस भवन जळगाव येथे “सत्याग्रह ” करून आंदोलन करण्यात आले, या प्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, नदीम काझी, विजय वाणी, मुक्तदीर देशमुख, सरचिटणीस प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे,मुजीब पटेल सुधीरभैय्या पाटील, आनंद गोयर, अरुण चव्हाण, युवक शहर अध्यक्ष मुजीब पटेल,विशाल पवार, गोकुळ चव्हाण, जाकीर बागवान, मालोजी पाटील, अण्णा जाधव, रवी चौधरी, मीना जावळे, अमीना तडवी, योगिता शुक्ल,नारायण राकाँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, महानगराध्यक्ष श्याम तायडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
