
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्वाधिक आर्थिक उलाढालीत अग्रेसर असलेल्या ग. स. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी खूप मोठे नाटक पहायला मिळाले. सहकारचे गटाचे उदय पाटील यांनी लोकसहकारच्या दोन सदस्यांना रात्री त्यांच्या गटातून फोडल्याने निवड प्रक्रियेत नेमके कुणाचे सत्ता स्थापन होणार याकडे लक्ष लागून आहे. यावेळेस पोलीस अधिकारी कुमार चिंथा यांची एन्ट्री होताच सर्व गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रस्ता मोकळा केला.
दि ११ रोजी लोकसहकार आणि प्रगती शिक्षक सेनेच्या पॅनलने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. यात अध्यक्षपदी रावसाहेब पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल गायकवाड हे अर्ज भरणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.
त्यानंतर सायंकाळी सहकार गटाचे नेते उदय पाटील एक फोटो सोशल मीडियात व्हायरल करत आपल्यासोबत अकरा ही मॅजिक फिगर असल्याचे जाहीर केल्याने आजची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले होते. या अनुषंगाने आज दुपारी साडेबारा वाजेपासून सर्व संचालक क्रमाक्रमाने ग. स. सोसायटीमध्ये दाखल झाले. दुपारी एक वाजेपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
ग.स. बाहेर पोलिसांचा फौजफाटा
आज दुपारी १२ वाजेपासून लोकसहकार गटातील २ सदस्य फुटल्याने गटातील पदाधिकारी व कार्यकर्तेयानी त्या दोन सदस्यांना सभागृहात जाण्यापासून रोखले होते. यावेळी शहर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त असल्यावर सुद्धा पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थिती नव्हते तर यावेळी पोलीस अधिकारी कुमार चिथा यावेळी आले असता. येथील दोन्ही गटाचे कार्यकर्त्रे बाजूला होऊन त्या दोन सदस्यांना सभागृहात जाता आले.
आज साडेबारा वाजेच्या सुमारास दोन्ही पॅनलचे संचालक सोसायटीत निवड प्रक्रियेसाठी दाखल करत असतांनाच लोकसहकारचे दोन सदस्य हे सहकार पॅनलच्या संचालकांसोबत आल्याने एकच खळबळ उडाली. लोकसहकारच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत या दोघांना सभागृहात जाऊ देणार नसल्याची भूमिका घेतली. यामुळे येथे प्रचंड गोंधळ उडाला. बराच वेळ संचालकांना मध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. अखेर प्रचंड पोलीस बंदोबस्तात एक वाजता सहकार गटाचे सर्व संचालक लोकसहकारच्या दोन सदस्यांसह सभागृहात दाखल झाले. सभागृहात जाण्याआधी मनोज पाटील म्हणाले की, आमच्या दोन गटाला आमीष देऊन रात्री त्यांना पळवून नेले. यात रवींद्र सोनवणे भडगाव आणि ज्ञानेश्वर सोनवणे जळगाव हे दोन सदस्य फुटल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे सहकारचे सर्वेसर्वा उदय पाटील यांनी विरोधकांना हादरा दिल्याचे दिसून आले आहे.






















