चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स अँड के.के.सी कॉमर्स महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट,व अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने करीअर मार्गदर्शन आणि सरकारी नोकरीतील संधी या विषयावर आभासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे समन्वयक प्रा.नितीन नन्नावरे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात व्याख्यानाचा उद्देश व महत्व सांगीतले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.अजय काटे यांनी शुभेच्छापर मनोगतात स्पर्धा परीक्षेतून अनेक संधि प्राप्त होत असल्याचे सांगितले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी संदर्भात सतत मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.अकादमीचे मार्गदर्शक श्री.सौरभ सोनावणे यांनी पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना अभ्यासाचे नियोजन कसे करावे,त्यातील आव्हाने कशी पेलावीत याबाबत मार्गदर्शन केले.एमपीएससी व यूपीएससी परीक्षेतून कोणत्या संधि प्राप्त होतात याबाबतही सुचविले.तसेच विध्यार्थ्यांच्या अनेक प्रश्न व शंकांचे निरसन केले.सदर कार्यशाळेस प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन प्रा.रविंद्र पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. मुकुंद अहिरे, प्रा.विपुल येवले यांचे सहकार्य लाभले.