जामनेर : प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा २.० अंतर्गत शहरातील मुख्य रस्ते दररोज सकाळी स्वच्छ करून कचरा संकलन करून त्याची विल्हेवाट करण्याचे कार्य जामनेर नगर परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीने केले जात आहे. जामनेर शहर “स्वच्छ जामनेर सुंदर जामनेर” करण्याचा मानस जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांनी केला असुन त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचे रुप बदलवून कायापालट बघायला मिळत आहे.जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. चंद्रकांत भोसले यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्यासाठी आवाहन केले आहे.
शहरातील विविध भागात फवारणी केली जात आहे. आरोग्य विभाग प्रमुख सुरज पाटील तसेच आरोग्य विभाग शहर समन्वयक श्रुतीसागर पाटील, आरोग्य विभाग सहाय्यक गजानन माळी, त्याच प्रमाणे आरोग्य विभागाचे कर्मचारी मेहनत घेतांना दिसत आहेत.