मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील नगरपरिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील २ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगानं जिल्ह्यातील २ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल.
जिल्ह्यतील ब वर्ग नगरपालिका अमळनेर, चाळीसगाव तर क वर्ग नगरपालिकामध्ये वरणगांव, धरणगाव, एंरडोल, फैजपूर, पारोळा, यावल असे आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम
जिल्हाधिकारी कार्यक्रम जाहीर करणार : २० जुलै
उमेदवारी अर्ज उपलब्ध : २२ ते २८ जुलै
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी २२ ते २८ जुलै
अर्जाची छाननी : २९ जुलै
अर्ज मागे घेण्याची मुदत : ४ ऑगस्ट दुपारी ३ पर्यंत
उमदेवारी अर्जावरील आक्षेप : ८ ऑगस्ट
मतदानाचा दिनांक : १८ ऑगस्ट
मतमोजणी आणि निकाल : १९ ऑगस्ट




















