जळगाव : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध उपक्रम घेऊन राबविण्यात आला. सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिला वाढदिवस असल्याने ठाकरे समर्थकांतर्फे विविध उपक्रमातून ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
भडगाव
भडगाव तालुका शिवसेना तर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव ग्रामीण रुग्णालय येथे फळवाटप करत त्यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबविली.
यावेळी उपस्थित मा.उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी,उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, मा.शहरप्रमुख मनोहर चौधरी, तालुकाप्रमुख लखीचंद पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे. के. पाटील, महीला आघाडी शहरप्रमुख पुष्पाताई परदेशी, गोरख पाटील, भाऊसाहेब पाटील, संजय पाटील, राजु शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, युवासेना शहरप्रमुख बंटी सोनार, पप्पू पाटील, प्रशांत गालफाडे, चेतन पाटील, हर्षल पाटील, भोला पाटील, महेश पाटील, गोपी पाटील, विशाल पाटील, प्रशांत सोनवणे, कुणाल गंजे, राहुल कासार, सचिन पाटील, अमोल पाटील, महेश पाटील, दीग्विजय पाटील, सागर पाटील तसेच भडगाव तालुका व शहरातून असंख्य शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.
धरणगाव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस २७ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रमांबरोबरच शिवसेना सभासद नोंदणीचा विक्रम करून साजरा केला. जिल्हा अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन ठाकरेंचा वाढदिवस साजरा होणारा असे शिवसेना जळगाव लोकसभा सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिली.
शिवसेनेतून आमदार खासदार फुटले असले तरी शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहेत. शिवसेनेला जनतेतूनही मोठा पाठींबा मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त सभासद नोंदणीची भेट देण्याचे आवाहन केले असून त्यांच्या आदेशानुसार जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात शिवसेना सभासद नोंदणी केली जाणार आहे असे गुलाबराव वाघ यांनी सांगितले आहे.
यावेळी उपस्थित शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ. जिल्हा संघटक अँड.शरद माळी, उप तालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मा. उपनगराध्यक्ष देवा महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश महाजन , भागवत चौधरी, अहमद खान पठाण, जितेंद्र धनगर, मा. किरण मराठे, मा.उप प्रमुख कृपाराम महाजन, शिवसेना तालुका संघटक धीरेंद्र पुरभे, उप शहर प्रमुख किरण अग्निहोत्री, रवींद्र जाधव, भरत महाजन, विभाग प्रमुख गजानन महाजन, बापू (सुनील) महाजन, युवा सेना उपशहर प्रमुख कमलेश बोरसे, पप्पू कंखरे, दिपक पाटील, छोटू चौधरी, शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष शहर नदीम काझी, लक्ष्मण महाजन, विजय महाजन, परमेश्वर महाजन, हेमंत महाजन, राहुल रोकडे, विलास पवार, छोटू जाधव, नागराज पाटील, सुदर्शन भागवत, भगवान महाजन, सुभाष महाजन, चेतन जाधव, पप्पू सोनार, सचिन चव्हाण, आयास सिद्दिकी, गौरव महाजन, बापू चौधरी, समाधान महाजन, आपु महाजन, रामकृष्ण महाजन, शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे, मीडिया प्रमुख जयेश महाजन, आदी शिवसैनिक उपस्थित होते,
जामनेर
जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहर शाखेच्या वतीने वाटप करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना शहर शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहर प्रमुख अतुल सोनवणे शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ युवा सेना माजी उपजिल्हाप्रमुख एडवोकेट भरत पवार उपशहर प्रमुख सुरेश चव्हाण उपशहर प्रमुख कैलास माळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख एडवोकेट प्रकाश पाटील खुशाल पवार ज्ञानेश्वर राठोड युवराज पाटील यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहुर शिवसेना शहर शाखेच्या वतीने येथील गणपती मंदिरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे प्रमुख संजय तायडे उपशहर प्रमुख सुभाष पाटील शहर संघटक संजय देशमुख युवा सेना उपतालुकाप्रमुख अमीन शेख सादिक पठाण रघुनाथ सोनवणे शुभम बारी युवा सेना शहर प्रमुख शुभम घोलप शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरणगाव
शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै बुधवार रोजी जिल्हा परिषद कन्या शाळेमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह लाडुंचे वाटप करण्यात येणार आहे. शालेय वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या मुखावर आनंद दिसून आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन , विलास मुळे, सुभाष चौधरी, विजय सुरवाडे, शे सईद शे भिकारी , महिला आघाडीच्या योगिता सोनार, सुनिल भोई, प्रल्हाद माळी आदीच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंद दिसून आला.
या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता सोनवणे, शिक्षक रविंद्र पोळ, राकेश कुलकर्णी, शिक्षिका विजया परदेशी यांनी सहकार्य केले तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुका संघटक मोहसीन खान, उपशहर प्रमुख अशोक शर्मा, सुनील भोई, संजीव कोळी, आबा सोनार, शिवा भोई, शाहरुख खान, किरण माळी, अतुल माळी, तेजस माळी, निखील माळी, हर्षल माळी, अतुल पाटील, दीपक शेळके, वैभव लोखंडे तसेच आदी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
