पारोळा ः प्रतिनिधी
तालुक्यातील जि.प.शाळा हिवरखेडे बु. या शाळेला सन 2021-22 या वर्षासाठी स्वच्छ शाळा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे.
17 जून रोजी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शाळेच्या शाळेचे मुख्याध्यापक दगडू पाटील, उपशिक्षक ईश्वर धोबी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्कार वितरणप्रसंगी तालुक्याचे आ.चिमणराव पाटील, आ.शिरीष चौधरी, आ.संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ.पंकज आशिया, शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्य.शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातून सर्व स्तरातून शाळेचे व शिक्षकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.