सध्या खान्देशात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र भारतातील राजस्थान, केरळ, आसाम आणि बिहारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. काही दिवसांपूर्वी आपण जोधपूरमधील रस्त्यांना कसं नदीचं स्वरुप प्राप्त झालं होतं तो व्हिडीओ पाहिला होता. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातही जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत जर संततधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात पाणी साचतं. असंच काहीस उत्तरप्रदेशातील लखनऊची पावसाने पोलखोल केली आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
ये लखनऊ है, जनाब..!!!
या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता बघावं तिकडे पाणीच पाणी आहे. लखनऊमधील या रस्त्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. लखनऊमध्ये जरासुद्धा पाऊस झाला तर रस्ते जलमय होऊन जातात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावर पाणी साचल्यामुळे लोकांना गाडी चालवण्यास त्रास होतो आहे. अगदी रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठीही लोकांचे हाल होत आहेत. लखनऊ ही उत्तर प्रदेशाची राजधानी आहे. जर पावसात या शहराची अशी परिस्थिती असेल तर इतर शहारांचं काय होणार याची कल्पनाच करा.
Not sure about flying cars, but in 2022 we have floating cars.
Scenes from Lucknow today. pic.twitter.com/X2JsS3STAJ
— Areeb Uddin (@legallyuddin) July 31, 2022
हा व्हिडिओ ट्विटरवर अरिबुद्दीनने शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, ‘’उडत्या कार्सबद्दल काही खात्री नाही, पण 2022 मध्ये आमच्याकडे तरंगत्या कार्स नक्कीच आहेत. लखनऊचे दृष्य’’. अवघ्या 19 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 3 लाख 72 हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. तर 7 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ 31 जुलैला शेअर करण्यात आला होता.
या व्हिडीओला पाहून कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, ”माझा देश बदलत आहे”. तर एक स्थानिक यूजर म्हणतो, ”असं कधीच झालं नाही, मी 15 वर्षांपासून लखनऊमध्ये राहतो. राजधानीची अशी अवस्था पाहिली नाही.”