जळगाव : प्रतिनिधी
कोरोनाच्या सावटाखाली गेल्या दोन वर्षापासून घरात अडकून असलेल्या दिव्यांग मुलांनी धुलिवंदन नैसर्गिक रंग उधळत साजरी केली. उडान फाऊंडेशनतर्फे जळगावात दिव्यांग मुलामुलींनी धुलिवंदन साजरे करीत आनंद साजरा केला.
रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण संस्थेतर्फे जळगावात दिव्यांग मुलांसाठी शुक्रवारी इकोफ्रेंडली धुलिवंदन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक रंगांची उधळण करीत दिव्यांगांनी मनमुराद आनंद लुटला. एकमेकांना रंग लावत विद्यार्थ्यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या. मराठी-हिंदी गाण्यांच्या तालावर ठेका धरत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. प्रसंगी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, विनोद शिरसाळे, प्रवीण चौधरी, अजय तळेले, धनराज कासट, हेमांगी तळेले, चेतन वाणी, तुषार भांबरे, रजत भोळे, सोनाली भोई, जयश्री पटेल, हेतल वाणी, गायत्री भांबरे, चिन्मय जगताप, अक्षद बेंद्रे आदी उपस्थित होते.