• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 16, 2026
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
कीर्तनकाराचा क्रूर चेहरा उघड : अल्पवयीन मुलीला गुप्तांगाजवळ चटके देत तीन वर्षे अत्याचार!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ मार्च २०२६

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील एका गावात कीर्तनकाराने विकृतीचा कळस गाठल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ४० वर्षीय कीर्तनकाराने अल्पवयीन मुलीवर तब्बल तीन वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून थोरातला अटक केली. पारनेर न्यायालयाने आरोपीला शुक्रवार, २० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीच्या संस्थेत काम करणाऱ्या तरुणाच्या लहान बहिणीला संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत आरोपी गेल्या तीन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. पीडित मुलगी इयत्ता आठवीत असतानापासून हा प्रकार सुरू असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने पीडितेला अमानुष छळ केल्याचेही समोर आले आहे. स्वयंपाकाची लोखंडी पकड गॅसवर तापवून तिच्या गुप्तांगाजवळ चटके दिल्याचा आरोप आहे. या क्रूर कृत्यानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते.

पीडिता घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना तो वारंवार तिच्यावर अत्याचार करत असल्याचे उघड झाले आहे. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास आरोपी तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देत होता. “मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत. जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना व भावाला मारून टाकीन,” अशी भीती तो तिला दाखवत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या भीतीने पीडितेला हा छळ सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान, १४ मार्च रोजी पीडित मुलगी अस्वस्थ असल्याचे भावाच्या लक्षात आले. त्याने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पाच दिवसांपूर्वी म्हणजे १० मार्च रोजी आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले होते. तिने जाण्यास नकार दिला असता त्याने संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीने तिला बांबूने आणि हाताने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सुमारे दहा वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाथरे येथून पारनेर तालुक्यात आला होता. अण्णासाहेब गुंजाळ हे त्याचे मूळ नाव असताना परिसरात प्रभाव असलेले ‘थोरात’ आडनाव त्याने धारण केले होते. आरोपीच्या निवासी वारकरी शिक्षण संस्थेत सध्या सुमारे २० विद्यार्थी अध्यात्म व वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत असल्याची माहितीही पुढे आली आहे.

दरम्यान, पारनेर तालुक्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर अत्याचार केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यापूर्वी पारनेर शहरातील एका लॉजवर शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती. अशा घटनांमुळे तालुक्यात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात खळबळ : एकाच दिवशी दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

August 26, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

संतापजनक : २७ वर्षीय महिलेशी गोड बोलून अत्याचार : संशयित अटकेत !

August 26, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी

August 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

शिरसोलीतील २५ वर्षीय तरुण धरणात बुडाला !

August 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group