
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील प्रत्येक गल्लीतील रस्त्यांची चाळणी होऊन नेहमी याठिकाणी अपघात होत आहे. याच अनुषंगाने धर्मरथ फाऊंडेशनतर्फे नागरिकांची स्वाक्षरी मोहीम १३ रोजी घेण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, शिवाजी नगर ते लाकूड पेठ येथे दिनांक ८ मार्च रोजी नागरिकांनी छत्रपती शिवाजीनगर वासियानी रस्ता बंद करून आंदोलन करण्यात आले होते परंतु जळगाव महानगरपालिकेकडून या आंदोलनाची कुठलीही दखल घेतलेली नाही व रोड बनवणे संदर्भात कुठलाही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आता पुन्हा धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी नगर प्रभाग क्रमांक दोन येथे रोड भरण्यासंदर्भात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलेली आहे स्वाक्षरी मोहीम राबवित असताना नागरिकांना होणारा त्रास व प्रशासनावर राग त्यांनी व्यक्त केला रोड बनविणे संदर्भातलं जी निवेदन आम्ही माननीय आयुक्तांना देणार आहोत त्यामध्ये छत्रपती शिवाजीनगर,लाकडू पेठ मधील कंक यांच्या घरापासून ते दालफड,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते घरकुल हुडको तसेच अमर चौक,मज्जितची गल्ली तर थेट मशानभुमी पर्यंत रोड बनवण्याची मागणी या निवेदनामध्ये देण्यात येणार आहे तरी प्रशासनावर येतात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा जळगाव महानगरपालिका प्रशासनाला आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
या स्वाक्षरी मोहीमेत विनायक पाटील ,शकीब, कैलास सागोरे, बाबा देशमुख,आसिफ, शमशोदिन जनाब , एजाज सय्यद, रफिक,नाझीम, अकिल पटेल, संतोष भिताडे, लीम, राजा मिर्झा ,कलीम पटेल, तुषार सूर्यवंशी, कुणाल हटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.






















