दहीगाव : प्रतिनिधी
सावखेडा सिम येथील गटारी व मुतारीचे बांधकाम पंचायत समिती मार्फत सुरू असून ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कामांची चौकशी करावी अन्यथा ग्रामस्थ उपोषणास बसण्याच्या तयारीत असल्याचा इशारादेण्यात आला आहे.
सावखेडा सिम येथील नागदेवी रस्त्यालगत गटारीचे बांधकाम सुरू आहे. तर दहिगाव येथे डोंगर रस्ता लगत मुतारीचे बांधकाम सुरू आहे. ही बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. यात सिमेंटचे प्रमाण कमी होत असल्याने ही कामे त्वरित खराब होतील असे गावातील जाणकारांचे मत आहे. या कामांची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व ठेकेदाराला धारेवर धरून काम उच्चप्रतीचे करावे अन्यथा पंचायत समिती समोर उपोषणाला बसतील असा इशारा काही ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.