अमळनेर : प्रतिनिधी
युवा क्रीडा मंत्रालय अंतर्गत देशाचे ७५ वर्ष स्वतंत्र अमृत महोत्सव निमित्ताने घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने व भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या शहीद दिवस निमित्ताने अंमळनेर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. म्हणून मनुष्याने एकमेकास सहकार्य करून प्रत्येक व्यक्तीस उपयोगी पडेल असे सामाजिक काम आपल्या हातून व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबण्यात आला.
देश स्वतंत्र साठी आपले बलिदान अर्पण करणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे समाज उपयोगी विचार आत्मसात करून नेहरू युवा केंद्र मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. रक्तदाता सर्वश्रेष्ठ दाता असतो आणि रक्ताची गरज प्रत्येक व्यक्तीला संकट काळी आवश्यकता असते. त्यासाठी माधवराव गोळवलकर रक्तपेढी व त्याचे सर्व पदाधिकारी यांनी अंमळनेर येथे येऊन लोकांची रक्त तपासणी, स्त्रीयांसाठी हिमोग्लोबिन तपासणी आणि रक्त संकलन करण्याचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.
आलेल्या सर्व रक्त पिढीतील लोकांचा सत्कार करण्यात आला व प्रत्येक रक्तदात्याला माधवराव गोळवलकर रक्त पिढीकडून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. रक्ताचे महत्व व त्याची गरज आणि आपण समाज उपयोगी कसे पडू शकतो याची प्राथमिक माहिती प्रास्ताविक स्वरूपात वैशाली पाटील यांनी दिली.