पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थित शिवसेना कार्यालयात तिथीप्रमाणे शिवजयंती येथील साजरी करण्यात आली. याप्रसंगी पाचोरा मतदार संघाचे आ. किशोर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस फुलहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपुत, तालुका प्रमुख शरद पाटील, मा. नगरसेवक महेश सोमवंशी, डॉ. भरत पाटील, रहेमान तडवी, बंडु चौधरी, गंगाराम पाटील, बापु हटकर, प्रा. गणेश पाटील, स्विय्य सहाय्यक राजेश पाटील, नाना वाघ, भरत खंडेलवाल, संदीपराजे पाटील, जितेंद्र पेंढारकर, राहुल पाटील, गौरव पाटील, राजु पाटील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सालाबादप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणारी शासकीय शिवजयंती देखील तिथीप्रमाणे साजरी करण्यात यावी, या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.