पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मु. मा. महाविद्यालय पाचोरा येथील प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आपल्या महाविद्यालयातील सिनीयर कॉलेज गाणित विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वैष्णवी महाजन यांनी जे. जे. टी. यु. मधुन नुकतीच पी. एच. डी. प्राप्त केल्या केल्या बद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. पी. आर. सोनवणे, प्रा. एस. आर. ठाकरे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. जे. डी. गोपाळ प्रा.वाय. बी. पुरी यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. याकार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. के. एस. इंगळे यांनी तर आभार प्रा.डॉ. एस.बी.तडवी यांनी व्यक्त केले.