जळगाव मिरर टीम
नंदुरबार : वृत्तसंस्था
मुलीने पळून जात प्रेमविवाह केल्याने वडिलांसह दोघा भावांच्या मनात राग होता. त्यांनी मुलीचा पती अजय गावित यास चाकूने वार करत ठार केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह दोघा पुत्रांना येथील न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. तिवारी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
काय आहे घटना
अजय राजाराम गावीत (२२, रा. बोरविहीर, ता. नवापूर) या तरुणाने त्याच्या घराजवळ राहणाऱ्या मनिषा सखाराम गावित हिच्याशी प्रेमसंबंधातून पळून जात प्रेमविवाह केला. या गोष्टीचा मनीषा गावीत हिचे वडील सखाराम नरशी गावित, भाऊ समुवेल गावित व संदीप गावीत यांना प्रचंड राग होता. १२ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास या तिघांनी अजय गावित याच्या घरात शिरून अजय यास शिवीगाळ केली. तर त्याचवेळी संदीप गावीत याने अजयच्या छातीवर चाकूने वार करुन त्यास जिवे ठार केले. तसेच सखाराम गावीत याने अजयची आई सावित्रीबाई गावीत हिच्या पोटात त्याच चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.




















