
पाचोरा : प्रतिनिधी
तालुकयातील बांबरुड (राणीचे) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आ. दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणित सहकार पॅनलने भाजप प्रणित पॅनलचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला असून पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून माजी आ. दिलीप वाघ यांच्या खंबीर नेतृत्वात संस्थेने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली असून, शेतकरी हित लक्षात घेऊन सर्वसमावेशक व लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या सुज्ञ व शेतकरी उमेदवारांना संधी मिळावी म्हणून सहकार पॅनलवर मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवत सहकार पॅनल संधी दिली आहे.
सर्वसाधारण मतदार संघ गटातून दारकोंडे अशोक, गोराडे रवींद्र, जगताप राजेंद्र, कोकणे महादू, मेवाती उस्मानखा, शिंदे माणिक, सूर्यवंशी निवृत्त, वाघ ईश्वर, महिला राखीव मतदारसंघातून पाटील छायाबाई, पाटील सुरेखा, इतर मागासवर्गीय गटातून वाघ मधुकर, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून वडर महारु तर अनुसूचित जाती जमाती मधुन मनोज काटकर हे आधीच बिनविरोध विजयी झाले होते.
सहकार पॅनलच्या यशासाठी पि. टी. सी. चे संजय वाघ, दगाजी वाघ, ललित वाघ, शशिकांत वाघ, झुंबरलाल जैन, तोताराम कोकणे, नबी पिंजारी, हिंमत पाटील, बाबूलाल गरुड, रवींद्र काटे, अरुण शिंदे, देवराम गवळी, आबा वाणी, जयराम कोळी, दिलीप परदेशी, उत्तम बडगुजर, बुऱ्हान तडवी, गुलाब तडवी, पांडुरंग पाटील, नाना पाटील, सुभाष वाघ, शिवाजी काळे, मेहमूद मेवाती, पंजाबराव आढाव, भागवत शेवगे, बाळू चव्हाण, शिवाजी गरुड, नामदेव जगताप, समाधान डांबरे, भीमराव काटे, वसंत वाघ, सुभाष पवार, नामदेव जगताप, जगदेव जगताप, सिताराम दारकोंडे, प्रकाश चौधरी, युवराज काळे, मुराद तडवी यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.