मुंबई : देशभक्तीला अनुसरून चित्रपट दरवर्षी खूप कमी पहायला मिळतात मात्र यंदा ‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट ६ रोजी प्रदर्शित होत आहे. ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 6 मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एबीसी क्रिएशन प्रस्तुत, डॉ.आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग कृष्णा जाधव यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या नावावरून आणि नुकत्याच झळकलेल्या टिझर पोस्टरवरून हा देशभक्तीपर चित्रपट असल्याचा लक्षात येतंय. मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला ‘लाडू’ म्हणजेच राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बालकलाकारांनी काम केलं आहे.
चित्रपटात मंगेश देसाई, शशांक शेंडे, छाया कदम, हेमांगी कवी, नम्रता साळोखे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘भारत माझा देश आहे’ ची कथा पांडुरंग कृष्णा जाधव यांनीच लिहिली असून पटकथा, संवाद निशांत नाथाराम धापसे यांचे आहे.
