भुसावळ : प्रतिनिधी
उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि बलिया/गोरखपूर दरम्यान १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई – बलिया त्रै-साप्ताहिक विशेष (७८ फेऱ्या) 01025 विशेष दि. १.४.२०२२ ते २९.६.२०२२ पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १४.१५ वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी ०१.४५ वाजता पोहोचेल.
01026 विशेष दि. ३.४.२०२२ ते १.७.२०२२ पर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून १५.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.
थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर, वाराणसी, औंडिहार, मऊ आणि रसडा
मुंबई – गोरखपूर आठवड्यातून ४ वेळा विशेष (१०४ फेऱ्या) 01027 विशेष (आठवड्यातून ४ वेळा) दि. २.४.२०२२ ते ३०.६.२०२२ पर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १४.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
01028 विशेष (आठवड्यातून ४ वेळा) दि. ४.४.२०२२ ते २.७.२०२२ पर्यंत दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोरखपूर येथून १४.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.
थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर, वाराणसी रोड, मऊ, भटनी आणि देवरिया सदर
01025/01026 आणि 01027/01028 ची संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01025 आणि 01027 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २७.३.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देण्याचे किंवा NTES ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोविड योग्य वर्तनाचे अनुसरण करण्याचेही सांगण्यात आले आहे.
