
चोपडा : प्रतिनिधी
श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर व तालुका कार्यकारणी तसेच महिला आघाडीच्या वतीने ११ मे महात्मा दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले यांना मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या माध्यमातून समाजमनात प्रेरणास्थान असल्याने महात्मा ही पदवी ११ मे १८८८ रोजी प्रदान करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून श्री संत सावता माळी युवक संघाच्या चोपडा शहर व तालुका कार्यकारणीच्या वतीने ११ मे महात्मा दिन म्हणून साजरा करण्यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. तसेच चोपडा तालुक्यातील वेले येथील बालकाश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी एका वेळचे अन्नदान देऊन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या बालकांना व समाजातील मंडळींना जोतीरावांच्या कार्याची सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन व जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र एन.महाजन यांनी दिली.
या कार्यक्रमाला खान्देश विभागीय संपर्कप्रमुख समाधान माळी तसेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, चोपडा सचिव महेंद्र भामरे, सदस्य विजय माळी, महिला आघाडीतील जिल्हाध्यक्ष संध्या महाजन,तालुकाध्यक्ष कीर्ती महाजन, तालुका कार्याध्यक्ष मीना महाजन, तालुका सचिव माया महाजन तसेच बालकाश्रम वेले येथील रावसाहेब पाटील, जितेंद्र, ईश्वर, निलेश चौधरीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.






















