जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुदेशिय संस्थेमाफेत समाजबांधवामार्फे क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव 3 मे रोजी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष संदीप वाणी यांनी दिली आहे.
सविस्त माहिती अशी की, 3 मे मंगळवार रोजी सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमा पूजन त्यानंतर जळगाव महानगरपालिका कार्यालयात प्रतिमापूजन त्यानंतर दुपारच्या सत्रात त्यानंतर दुपारी 2 ते 4 यावेळेत समाजासाठी प्रबोधनपर व्याख्यानमालेत प्रा.रमेश आवटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सांय 4 वा. महात्मा बसवेश्वर जयंतीतर्फे मिरवणुक सोहळा जि.प.जवळील पत्रकार भवन येथून निधणार आहे. त्यानंतर रात्री 8 ते 10 यावेळेत अल्पोपहाराची व्यवस्था समाजबांधवांसाठी करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे आ.राजुमामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, माजी आ.स्मिताताई वाघ, प्रा.रमेश आवटे, प्रातांधिकारी महेश सुघळकर यांनी उपस्थिती राहील.
यांनी केले आयोजन
अध्यक्ष संदीप वाणी, उपाध्यक्ष गजानन आकाशे, सचिव संदिप मिटकरी, खजिनदार समिर गुळवे, सभासद विशाल लिंगायत, अमोल तोडकर, अजय बारसे, सतिष आंबेकर, किरण तोडकरी, सोमनाथ पतंगपुरे तर अरुण कस्तुरे, ज्ञानेश्वर बारसे, सुरेश तोडकरी, सुभाष गुळवे, उदय खांदे, मल्लीकार्जुन ज्ञाने, संजय कापसे, उमाकांत नष्ठे, चंद्रकांत मिटकरी, प्रभुदेव तोडकर, दिनकर तोडकर यांचेही अनमोल सहकार्य लाभले.