भुसावळ :प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला स्वयं रोजगार योजनेअंतर्गत उद्योजकता विकास शिबिर येथील मैत्री सागर मीता बुद्ध विहार शिवाजी नगर मध्ये घेण्यात आले. सूत्रसंचालन संगीता भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा प्रशिक्षण समन्वयक महेंद्र सोनवणे , उदय उपस्थित होते अध्यक्षस्थानी भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अँड तुषार पाटील उपस्थित होते . विधी सेवा समीती व वकील संघाच्या संयुक्त विदयामाने माहिलांसाठी कायदे विषयक मागदर्शन करण्यात आले.
प्रसंगी जिल्हा उदयोग केंद्र व मिटकॉनचे सर्व अधिकारी जिल्हा प्रशिक्षण समन्वयक महेंद्र सोनवणे, उदय सोनार, श्री. सुरवाडे, श्री. ढाके तसेच प्रशिक्षण शिक्षीका वनिता झोपे उपस्थीत होते. अध्यक्षस्थानी वकिल संघाचे अध्यक्ष अँड. तुषार पाटील यांची उपस्थीती होती. अँड. कैझर भारमन, अँड. पाडव, उदयोजक योगेश पवार, रवींद्र पाटील, अँड. अभिषेक पाल, अँड. प्रतिभा अग्रवाल, भारती म्हस्के, अँड. जास्वंदी भंडारी, दक्षता समीती व कायदे विधी सदस्य सौ संगिता राजेंद्र भामरे, निरंजना तायडे, राजेश्री सुरवाडे, अंजूम खान मान्यवरांची प्रशिक्षणार्थी महीलांना बहुमोल मार्गदर्शन केले
या कार्यक्रमामध्ये ६० महिलांना प्रमाणपत्र व प्रत्येकी एक हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात आले . एक महिन्याचे कालावधी दरम्यान महिलांना बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष अँड तुषार पाटील यांनी उपस्थित महिलांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शना केले तर अँड खाएब यांनी बँकेच्या कर्ज योजना , मुद्रा लोन याबाबत सविस्तर माहित्ती दिली अँड .भारमल यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात सौ संगीता यांनी आर्थिक विकास ,बचत गट संदर्भात सांगितले निरंजना तायडे यांनीही मनोगत व्यक्त केले सुत्र संचालन संगीता भामरे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद निळे, दिपाली निळे यांनी केले . कार्यकम यशस्वीतेकरीता समाजसेविका सौ संगीता भामरे, प्रमोद निळे व दिपाली निळे यांनी परिश्रम घेतले .मैत्री सागर मिता मंडळातर्फे संगिता भामरे, आरती चव्हाण, सुमनताई सावळे, पंचशिला जाधव यांचे सहकार्य लाभले,