भुसावळ :प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला म्हणजे मातृत्व व दातृत्व यांचा संगम असल्याचे येथील सक्षम नारी फाउंडेशन यांनी कौतुकास्पद कार्य करून सिद्ध केले . समाजातील उपेक्षित असलेल्या निराधार मुलांची दखल घेवून त्यांना मायेचा व मदतीचा हात देत
सक्षम नारी फाउंडेशन तर्फे आश्रय माझे घर या जळगाव येथील आश्रमास इन्वर्टर बैटरी (सेट ) भेट देण्यात आला . तसेच दुपरच्या जेवनाची सोय करण्यात आली.
यावेळी फाउंडेशनच्या गायत्री विसपुते , पल्लवी अंबाडे , डॉ रंजना अनुस्कर ,संघमित्रा ढाकने, वंदना कांबळे, शीतल मोरे , सुनीता जोशी, सुनंदा डांगे, संगीता जगताप, डॉ वैशाली रामवंशी , वंदना हंस , डॉ सुवर्णा गाडेकर , सुयश सोनार आदीं उपस्थित होते . सक्षम फाउंडेशन सदस्य यांनी सहकार्य केले .