जळगाव : प्रतिनिधी
भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती पदासाठी आज सकाळपासून मत मोजणी सुरु होती. या निवडणुकीत आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू याच ठरल्या आहेत. द्रोपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा यांच्यावरती सहज विजय प्राप्त केला आहे. आत्ताच राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल हाती आला आहे.
जळगावातील भाजप कार्यालयात राष्ट्रपतीपदी NDA च्या उमेदवार श्रीमती द्रोपती मुर्म यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाले आणि राष्ट्रपतीपदी निवड झाली त्यांच्या विजयाचा आनंद उत्सव आज वसंत स्मृती जळगाव जिल्हा कार्यालय येथे फटाके फोडून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजु मामा) व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सीमाताई भोळे, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, ग्रामीण चे सरचिटणीस सचिन पान पाटील, मनपा गटनेता भगत बालानी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दीपक साखरे, राजेंद्र मराठी, महेश चौधरी, राहुल वाघ, भगतसिंग निकम सर, धीरज वर्मा, प्रकाश पंडित, गणेश माळी, रेखाताई वर्मा, शोभाताई कुलकर्णी, मंडळ अध्यक्ष शक्ति महाजन, विनोद मराठे, प्रल्हाद सोनवणे, चेतन तिवारी, गजानन वंजारी, भूषण भोळे, मिलिंद चौधरी, राहुल मिस्त्री,रोहित सोनवणे, सचिन बाविस्कर, राहुल पाटील,भूषण बोडे, शुभम पाटील, ललित बडगुजर, स्वप्निल साखळीकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















