
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील माल धक्क्यावर मुकादम तसेच माजी नगरसेवक राजू पटेल यांच्यावर पैशाच्या वादातून चॉपरने हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील दूध फेडरेशन परिसरातील रहिवासी व माजी नगरसेवक राजू बिसमिल्ला पटेल (वय-४७) जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. जळगाव रेल्वेस्टेशनवरील माल धक्क्यावर मुकादम म्हणून कामाला आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी १४ मे रोजी कामावरून दुपारी १ वाजता घरी जेवणासाठी गेले. त्यानंतर दुपारी ४ वाजेच्या सुमारास राजू पटेल यांना एकाला फोन आला की मालधक्क्यावर भांडण सुरू आहे तुम्ही माल धक्क्यावर येण्याचे सांगितले. त्यानुसार पटेल हे लागतीच मालधक्क्यावर गेले. मालधक्क्यावर हमालांना कमी पैसे देवून मालकांकडून जास्तीचे पैसे घेत असल्याची तक्रार राजू पटेल यांनी माथाडी मंडळाकडे केली होती. या तक्रारीच्या रागातून छोटू बाविस्कर व इतर सात ते आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. यात छोटू बाविस्कर याने हातील चॉपरने पटेल यांच्या पायावर वार करून गंभीर जखमी केले. घटना घडल्यानंतर राजू पटेल यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात बाविस्कर आणि इतर ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.






















