
इंदोर : वृत्तसंस्था
मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील घागरगाव इथे मोठी दुर्घटना घडली आहे. ४० प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच १५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. खलघाट येथील संजय सेतू येथे हा अपघात झाला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ही बस महाराष्ट्र रोडवेजची असल्याचे खासदार गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
बस इंदौरहून जळगावला जात होती. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, नदीचा प्रवाह अतिशय वेगवान आहे. बसमध्ये ५०-५५ जण होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले
या घटनेनंतर विभागीय आयुक्त डॉ पवनकुमार शर्मा यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. ही दुर्घटना खाल घाटात बांधलेल्या नर्मदा पुलाची असल्याचे सांगण्यात येत आहे. बस इंदौरहून महाराष्ट्राकडे जात होती. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. खरगोनचे जिल्हाधिकारी कुमार पुरषोत्तम आणि एसपी धरमवीर सिंहही घटनास्थळी पोहोचले आहेत. बसमध्ये इंदौर आणि पुण्याचे लोक होते, असे सांगण्यात येत आहे.
घटनास्थळी मदतीसाठी-०९५५५८९९०९१