पाचोरा : प्रतिनिधी
विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असते स्थानिक स्वराज्य संस्थांमधुन निवडुन आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्याची माहिती देऊन त्यांच्या ज्ञान कौशल्यात वूदधी होण्यासाठी अंतर्गत प्रक्षिक्षणा साठी जिल्ह्यातील सात महिलांची निवड करण्यात आलेली आहे. त्यात पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथील महिला सरपंच ज्योती हेमराज पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.
पुणे येथे होत असलेल्या दि. २१ ते २३ या कालावधीतत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे या संस्थे मार्फत राष्ट्रीय महिला आयोगाने सुचविलेल्या शिफारशी नुसार गावाच्या विकासासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.राष्टीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रक्षिक्षणात भाग घेतलेल्या महिला सरपंचांन मधुन “यशदा” प्रक्षिक्षणासाठी मोहाडी गावच्या सरपंच ज्योती पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.