जळगाव :प्रतिनिधी
व्हॉइस ऑफ डॉग या प्राणीमित्र संघटनेतर्फे जळगाव शहरातील १५० पेक्षा जास्त प्राण्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले. यामध्ये मोकाट आणि पाळीव कुत्रे तसेच मांजरींचा समावेश होता. शिबिरात सर्व प्राण्यांचे निर्जंतुकीकरण आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. संघटनेने रबिवलेल्या या मोफत शिबिरास जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वैजंती पेट केअर क्लिनिकचे डॉ. राठोड यांच्या मार्गर्शनाखाली शिबिर राबिविण्यात आले होते.
शिबिराच्या आयोजनासाठी व्हॉइस ऑफ डॉग संघटनेचे शुभम चौधरी, तुषार चौधरी, हेमंत चौधरी, मोहित सेठीया, पवन सपकाळे, विशाल निंबाळकर, भुषण कांबळे, रोहित नाथजोगी, आदिती अडकमोल, स्नेहा सोनवणे, अमित हिरोले, सुमित सोनवणे, राहुल पवार, विवेक सुतार या सदस्यांनी परिश्रम घेतले.